वेणूगोपाल धूत यांची तात्‍काळ सुटका करण्‍याचे निर्देश !

आयसीआयसीआय बँक व्‍हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी व्‍हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना १ लाख रुपयांच्‍या जामिनावर मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २० जानेवारी या दिवशी जामीन संमत केला आहे, तसेच त्‍यांना तात्‍काळ कारागृहातून सोडण्‍याचे निर्देश दिले आहेत.

शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्यावरील ‘इस्रो’च्या हेरगिरीचे आरोप खोटे !

सीबीआयची केरळ उच्च न्यायालयात माहिती
नारायणन् यांना अडकवणे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा सीबीआयचा दावा

सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !

गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता यांसंबंधी एकही तक्रार नसणे चिंताजनक ! – आशिष कुमार, अधीक्षक, ‘सी.बी.आय.’ (भ्रष्टाचारविरोधी पथक)

भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !

नाशिक येथे सैन्यातील मेजर आणि अभियंता यांना लाच घेतांना पकडले !

नाशिक येथील ‘कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या परिसरात मेजर आणि साहाय्यक गिअर्सन इंजिनियर हिमांशू मिश्रा अन् कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एका कंत्राटदाराकडून लाच घतांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या) पथकाने पकडले.

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.

‘सी.बी.आय.’ने हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहाची घेतली झडती

सोनाली फोगाट यांचा २३ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांनी बळजोरीने घातक अमली पदार्थ पाजल्याचा आरोप आहे.

महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीत सापडले ३ कोटी रुपयांची रोकड आणि ५० किलो सोने !

महंत नरेंद्र गिरी मृत पावल्यानंतर १ वर्षाने त्यांच्या खोलीची सीबीआयकडून पडताळणी

सोनाली फोगाट यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावे !

खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांच्या मुलगीने गोवा पोलिसांच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही !

आयकर विभागाकडून १०० ठिकाणी एकाच वेळी धाडी !

उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ५३ हून अधिक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.