देहली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या साहाय्यक संचालकास अटक

आरोपीला साहाय्य करण्यासाठी घेतली होती ५ कोटी रुपयांची लाच !

नवी देहली – देहली मद्य धोरण प्रकरणात एका आरोपीकडून साहाय्य करण्याच्या नावाखाली ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) साहाय्यक संचालकांसह अन्य ६ जणांना अटक केली. साहाय्यक संचालक पवन खत्री, नितेश कोहर (अप्पर विभागीय लिपिक), दीपक सांगवान (एअर इंडिया कर्मचारी), अमनदीप सिंग धल्ल, बिरेंदर पाल सिंह, प्रवीणकुमार वत्स (सनदी लेखापाल) आणि विक्रमादित्य (‘क्लेरिजेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांचा समावेश आहे. ईडीने या प्रकरणात ५२ कोटी २४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

संपादकीय भूमिका 

अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !