डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्याचा अर्ज सादर केला आहे. त्यामुळे संशयितांचे म्हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील. या प्रकरणी ५ जणांच्या विरोधात आरोप निश्चित केले होते; मात्र संशयितांनी गुन्हा मान्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांच्या विरोधात १३ पुरावे सीबीआयच्या वतीने न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !