काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना सीबीआयकडून अटक

आयएन्एक्स् मीडिया आस्थापनातील ‘मनी लाँडरिंग’ (पैशांची अवैध देवाण-घेवाण) प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने….

गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे दोषमुक्त

इशरत जहाँ चकमक प्रकरणातून गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने २१ फेब्रुवारीला दोषमुक्त केले.

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात खटला चालवायचा आहे की नाही ?

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात आम्ही काही प्रश्‍न विचारत आहोत, तर त्याची उत्तरे तुमच्याकडे का नाहीत ? खटल्यातील अनेक साक्षीदार फितुर झाले, असे तुम्ही म्हणता, हे अत्यंत गंभीर आहे. साक्षीदारांनी निर्भयपणे साक्ष द्यावी, यासाठी तुम्ही त्यांना सुरक्षा देण्याविषयी काय केले ?

‘सीबीआय’कडून देहली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

बहुचर्चित ‘बोफोर्स’ घोटाळ्याच्या प्रकरणी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या देहली उच्च न्यायालयाच्या वर्ष २००५ मधील निर्णयाला केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘सीबीआय’ने) १३ वर्षांनंतर विशेष अनुमती याचिकेद्वारे पुन्हा आव्हान दिले.

कोरेगाव भीमा दंगल घडवण्यासाठी नक्षलवादी संघटनांनी राज्यभरात सभा घेतल्या ! – गुप्तचर विभागाचे प्राथमिक अन्वेषण

कोरेगाव भीमा दंगल घडवण्यासाठी ४ मासांपासून नक्षलवादी संघटनांनी राज्यभर छोट्या मोठ्या सभा घेतल्या. मुंबईत त्यासाठी एकूण २३ सभा घेण्यात आल्या. या वादाला जातीय रंग देण्यासाठी नक्षलवादी संघटनांनी प्रयत्न केला,

डी.जी. वंजारा आणि इतर पोलीस अधिकार्‍यांच्या सुटकेला आव्हान देणार नाही ! – सी.बी.आय.

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात गुजरात राज्याचे माजी पोलीस उपमहासंचालक डी.जी. वंजारा, गुजरातचे आय.पी.एस्. अधिकारी राजकुमार पांडियन आणि राजस्थानचे आय.पी.एस्. अधिकारी …..

कोळसा खाण घोटाळ्याच्या प्रकरणी मधू कोडा यांच्या शिक्षेच्या निर्णयाला २२ जानेवारीपर्यंत स्थगिती

कोळसा खाण घोटाळ्याच्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या ३ वर्षांच्या शिक्षेला देहली उच्च न्यायालयाने तातत्पुरती स्थागिती दिली.

तात्काळ तिकिटांतील घोटाळ्याच्या प्रकरणी सीबीआयच्या प्रोग्रॅमरला अटक

रेल्वेची तात्काळ तिकिटे मिळवण्यात येणार्‍या अडचणींमागे मोठा घोटाळा झाला असल्याचे उघड झाले आहे. एका सॉफ्टवेअरचा वापर करून त्याच्या साहाय्याने तो केला गेल्याचेही समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे हे सॉफ्टवेअर केंद्रीय अन्वेषण विभागाच्याच (सीबीआयच्या) अजय गर्ग नावाच्या एका असिस्टंट प्रोग्रॅमरने सिद्ध केले आहे.

२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १ लाख ७६ सहस्र कोटी रुपयांच्या झालेल्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील तमिळनाडू येथील द्रमुक पक्षाचे तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा, श्रीमती कनिमोळी (द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या कन्या) यांच्यासह सर्व १७ आरोपींची २१ डिसेंबरला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

गुरुग्राम (हरियाणा) येथील रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्याची हत्या ११ वीच्या विद्यार्थ्यांकडून !

हरियाणाच्या गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेतील दुसरीत शिकणारा ७ वर्षांचा विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर याची ८ सप्टेंबरला शाळेतील प्रसाधनगृहामध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी शाळेच्या बसवाहकाला अटक केली होती.


Multi Language |Offline reading | PDF