५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरणार्‍या ब्रिटनमधील आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद

सुरक्षा यंत्रणांना याचा थांगपत्ता कसा लागला नाही ? त्यांना हे लज्जास्पद आहे !

नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याच प्रकरणात सीबीआयने ब्रिटनमधील ‘ग्लोबल सायन्स रिसर्च’ या आस्थापनाच्या विरोधातही कारवाई चालू केली आहे.