भारतीय स्टेट बँकेची ४ सहस्र ७३६ कोटी रुपयांच्या फसवणूक करणार्‍या आस्थापानांच्या संचालकांचे निवासस्थान आणि कार्यालय यांवर धाडी

  • सहस्रो कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !
  • भ्रष्टाचार्‍यांची घरे आणि कार्यालये यांवर बर्‍याचदा धाडी टाकल्या जातात; मात्र पुढे काही त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही, हे कसे ?

नवी देहली – भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांची ४ सहस्र ७३६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने भाग्यनगर येथील कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. आस्थापन आणि आणि तिचे संचालक यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.

वर्ष २०१३ ते २०१८ या कालावधीत या आस्थापनाने खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे बनवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने संचालकांच्या भाग्यनगर आणि विजयवाडा येथील निवासस्थान आणि कार्यालय यांवर धाडी टाकल्या.  यातून आक्षेपार्ह कागदपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.