पोलीस ठाणे, सीबीआय, ईडी आदी अन्वेषण यंत्रणांच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने पोलीस ठाणे, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आदी अन्वेषण यंत्रणांच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला आहे.

कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मंत्री रोशन बेग यांना कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात अटक

येथील ‘आय-मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’च्या (आय.एम्.ए.च्या) पोंजी योजनेतील घोटाळ्याच्या प्रकरणी सीबीआयने कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मंत्री रोशन बेग यांना अटक केली आहे. त्यांना सीबीआयच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते.

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला पाक सीमेवर तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक

पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या रवींद्र सिंह या सैनिकाला पाकसाठी शस्त्र आणि अमली पदार्थ यांची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे.

सीबीआय चौकशीसाठी राज्यांची अनुमती घेणे आवश्यक !  – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) चौकशीसाठी संबंधित राज्याकडून अनुमती घेणे बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे.