इशरत जहां चकमकीचे प्रकरण
कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील भाजप सरकार वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहां चकमकीच्या प्रकरणी दोषी असलेल्या ३ पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याची अनुमती देत नाही, अशी तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात केली आहे. पोलीस अधिकारी सिंघल, तरुण बारोट आणि चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. कायद्यानुसार सरकारी कर्मचार्यांना शिक्षा करण्यासाठी राज्य सरकारची अनुमती घेणे आवश्यक असते.