(म्हणे) ईडीच्या चौकशा लावण्यामागे फडणवीसांचा हात !

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

नगर – महाराष्ट्रात भाजपला अडचणीच्या ठरू शकणार्‍यांविरुद्ध आणि भाजपच्या विरोधात भूमिका असणार्‍यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशा लावल्या जात आहेत. यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांचा राजकीय हेतुने वापर करणार्‍यास प्रतिबंध करणारा कायदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणार आहे, असेही त्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ १६ फेब्रुवारी या दिवशी नगर दौर्‍यावर आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वरील आरोप केले.