प्रयागराज कुंभपर्व २०२५
सनातन पंचाग २०२५ चेही प्रकाशन

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – ‘श्री त्रिदण्डीदेव सेवाश्रम ट्रस्ट’च्या शिबिरात जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामी यांच्या हस्ते सनातनच्या ‘नामजप कौनसा करे’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे, तसेच सनातन पंचांग २०२५ चे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. श्री. चेतन राजहंस यांनी जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी यांना या ग्रंथाविषयी, तसेच सनातनचे कार्य आणि आश्रम यांविषयी सविस्तर माहिती दिली. यावर महाराजांनी सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली. या प्रसंगी स्वामीजींनी श्री. चेतन राजहंस यांचा सत्कार केला.