चीनने नियंत्रणरेषेवर उभारल्या २० हून अधिक चौक्या !
यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.
यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.
आतंकवाद्यांनाच नाही, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे !
देशाच्या रक्षणार्थ अनेक सैनिकांनी त्यांचे प्राण पणाला लावून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. काहींनी स्वत:च्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंगेश जोशी यांनी केले.
काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी पाकमध्ये त्यांची घाऊक निर्मिती चालू आहे. हे पहाता येथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले पाहिजे !
श्रीनगर येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले.
पाकसाठी हेरगिरी करणारा सीमा सुरक्षा दलाचा सैनिक प्रकाश काळे याला अटक करण्यात आली आहे. तो महाराष्ट्रातील नगरमधील सासेवाडी गावाचा रहिवासी आहे.
माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.
छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात येथील सी.आर्.पी.एफ्.चे जवान नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत. रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले.
तुम्ही मृत्यूला घाबरू नका, तर युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या, असे मार्गदर्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याच्या कमांडर्सना दिले आहे.
पाकच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले.