पाकच्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा

यापुढे भारताने पाकच्या सैनिकांना मारल्याच्याच बातम्या सातत्याने ऐकायला मिळाव्यात, ही अपेक्षा !

प्रेम बहादूर खत्री आणि सुखबीर सिंग

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले.

नायक प्रेम बहादुर खत्री आणि रायफल मॅन सुखबीर सिंह अशी या दोघांची नावे आहेत. पाकच्या गोळीबाराला नंतर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.