नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नाशिक येथील सैनिक नितीन भालेराव हुतात्मा

नाशिक – छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात येथील  सी.आर्.पी.एफ्.चे जवान नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत. रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात ‘कोबरा २०६’ बटालियनचे १० सैनिक घायाळ झाले. त्यात नितीन भालेराव यांचा समावेश होता. घायाळ सैनिकांना उपचारांसाठी तात्काळ रायपूर येथे विमानाने हलवण्यात आले; मात्र भालेराव यांचा उपचाराच्या वेळी रुग्णालयात मृत्यू झाला, तर अन्य ७ सैनिकांवर उपचार चालू आहेत.