पाकसाठी हेरगिरी करणारा सैनिक प्रकाश काळे याला अटक

प्रकाश काळे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील सासेवाडीचा रहिवासी

अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, ज्यामुळे इतरांना याचा वचक बसेल !

अमृतसर (पंजाब) – पाकसाठी हेरगिरी करणारा सीमा सुरक्षा दलाचा सैनिक प्रकाश काळे याला अटक करण्यात आली आहे. तो महाराष्ट्रातील नगरमधील सासेवाडी गावाचा रहिवासी आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये काळे अमृतसर येथे तैनात झाला होता. तो पाकमधील महिलेच्या संपर्कात होता. ती महिला पाकच्या इंटेलिजन्स ऑपरेटरची हेर होती. ऑगस्ट २०२० पासून महिलेला काळे याने सीमा सुरक्षा दलाच्या हालचालींची माहिती देणे चालू केले. त्याने सैनिकांचा एक व्हॉट्सअ‍ॅप गटही बनवला होता. तो स्वत:च त्याचा अ‍ॅडमिन होता. सैनिकांची नियुक्ती किंवा गस्त यांविषयी जी माहिती गटात टाकली जायची, ती महिलेपर्यंत आपोआप पोचायची. महिला भारतीय सिम कार्डचा वापर करत होती आणि ती त्याच गटाची सदस्यही होती.