मृत्यूला घाबरू नका, युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या !

शी जिनपिंग यांचे चिनी सैन्याला मार्गदर्शन

  • चीनने गेल्या ५० वर्षांत एकही युद्ध जिंकलेले नाही, तर त्याला व्हिएतनामसारख्या लहान देशानेही पराभूत केले आहे, हा इतिहास आहे !
  • वर्ष १९६२ चे भारतासमवेतचे युद्ध नेहरूंच्या राष्ट्रघातकी वृत्तीमुळे चीन जिंकू शकला अन्यथा त्या वेळीही त्याचा पराभव करता आला असता !
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – युद्ध जिंकण्यासाठी प्रशिक्षण अधिक भक्कम असले पाहिजे. सैनिकी प्रशिक्षण सातत्याने चालणारी गोष्ट आहे आणि सैन्याचे हेच प्रमुख काम आहे. युद्धाच्या वेळी अधिक प्रभावी होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. चीनचे लक्ष्य चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला जागतिक स्तरावर ‘लढाऊ दल’ करण्याचे आहे. तुम्ही मृत्यूला घाबरू नका, तर युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या, असे मार्गदर्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याच्या कमांडर्सना केल्याचे वृत्त ‘सिन्हुआ’ वृत्तसंस्थेने दिले आहे. काही मासांपूर्वीही जिनपिंग यांनी सैनिकांना म्हटले होते की, तुम्ही तुमचा मेंदू आणि ऊर्जा युद्धाच्या सिद्धतेवर लावा आणि सतर्क रहा.