चीनने नियंत्रणरेषेवर उभारल्या २० हून अधिक चौक्या !

बीजिंग (चीन) – चीनने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळील खालच्या भागात २० हून अधिक चौक्या उभारल्या आहेत. चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे लडाखमध्ये अद्यापही दोन्ही देशांचे प्रत्येकी ५० सहस्र सैनिक सीमावादामुळे तैनात आहेत.