औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याच्या प्रकरणी यंदाचे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजैब हा चांगला प्रशासक होता. त्याच्या काळात देशाचे सकल अंतर्गत उत्पादन (जीडीपी- ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट) चांगले होते’, असे वक्तव्य केले आणि संतापाची लाट उसळली. शिवप्रेमी आमदारांनी विधीमंडळात जोरदार भाषणे करून अबू आझमी यांचे या अधिवेशनापुरते निलंबन केले असले, तरी औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबलेले नाही.


१. औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीचा खर्च

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक सत्य समोर आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारणार्या औरंगजेबाच्या थडग्यावर सरकारचाच एक विभाग लाखो रुपये खर्च करत आहे, असे सरकारनेच लिखित स्वरूपात दिले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हणजेच आधीच्या औरंगाबाद जिल्ह्यात खुलदाबाद येथे औरंगजेबाचे थडगे आहे. औरंगजेबाचे हे थडगे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीचा वर्षनिहाय खर्च बाजूच्या सारणीत दिला आहे.
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.
औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त केले जाईल, अशी राष्ट्रप्रेमींची आशा !

१. ऐतिहासिक स्मारके ही समाजासमोर आदर्श निर्माण करतात. हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे अकबरुद्दीन ओवैसी वर्ष २०२२ मध्ये औरंगजेबाच्या थडग्यावर फुले उधळून गेले. औरंगजेबाच्या थडग्याला भेट देऊन कशासाठी प्रेरणा घेतली
जाते ? सरकार औरंगजेबाचे थडगे सांभाळून कुणाचा आदर्श देशासमोर ठेवत आहे ? हा प्रश्न देशप्रेमी विचारत आहेत.
२. औरंगजेबाचे थडगे सरकार स्वखर्चाने सांभाळत असतांना ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना छातीचा कोट करून मराठ्यांनी सांभाळले, त्या मावळ्यांपैकी बाजीप्रभु देशपांडे यांच्या विशाळगडावरील समाधीची सध्या दुर्दशा झालेली आहे. या समाधीपर्यंत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही. हीच परिस्थिती अनेक मावळे आणि महापुरुष यांच्या समाधींची आहे.
औरंगजेबाच्याच इच्छेने त्याची कबर खुलदाबाद येथील एका सुफी संतांच्या बाजूला खोदण्यात आली होती. औरंगजेब वर्ष १७०७ मध्ये मरण पावला, तेव्हा देशात मोगलांचेच राज्य होते. त्यानंतर ब्रिटिशांचे आणि काँग्रेसचे राज्य होते. आता देशप्रेमींचे सरकार आल्यामुळे हे थडगे उद्ध्वस्त केले जाईल, अशी आशा राष्ट्रप्रेमींना वाटत आहे.
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद