SC On Rape Cases : प्रेमसंबंध तुटल्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला नको !

समाज ज्या रितीने पालटत चालला आहे, त्यातून आपल्याला समजायला हवे की, संबंध (रिलेशनशिप) तुटणे, हा बलात्काराचा गुन्हा बनायला नको. आज नैतिकता आणि मूल्ये पालटली आहेत.

SC Judges Property Declarations : सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांची मालमत्ता घोषित करणार !

१ एप्रिल २०२५ या दिवशी  झालेल्या सर्वाेच्च न्यायालयाच्या बैठकीत सर्व ३४ न्यायाधिशांनी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत त्यांची मालमत्ता घोषित करण्याचा निर्णय घेतला.

Trump Tariffs Announcement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लादला २७ टक्के व्यापार कर !

चीन, व्हिएतनाम आणि तैवान यांच्यापेक्षा भारतावर अल्प कर !

US Woman Raising Kids In India : महान भारतीय संस्कृतीमुळे एका अमेरिकन महिलेचा तिच्या मुलांना भारतात वाढवण्याचा निर्णय !

कुठे मुलांचे बालपण समृद्ध व्हावे; म्हणून त्यांना भारतात वाढवण्याचा निर्णय घेणारी अमेरिकी महिला, तर कुठे मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या नावाखाली त्यांना अमेरिकेत वाढवण्याचा निर्णय घेणारे भारतीय पालक !

Allahabad HC On Conversion : धर्मांतर केवळ हृदय परिवर्तन आणि श्रद्धा यांद्वारेच होऊ शकते !

या जगात इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला, तर ईशान्य भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार आमीष दाखवून झाला, ही वस्तूस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. भारतात या दोन्ही गोष्टी आज चालूच आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

शेतमाल हमीभावाने खरेदी न झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी ! – भारतीय किसान संघ

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी सरकारला पाठिंबा दिला. निवडणुकीत कर्जमुक्ती, तसेच सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस यांची हमीभावाने खरेदी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत.

वेतनाअभावी ग्रंथालय कर्मचारी अडचणीत !

राज्यभरात अनुमाने ११ सहस्र १५० सार्वजनिक ग्रंथालये असून त्यात २० सहस्र ३२१ कर्मचारी काम करत आहेत. सरकारने वेळेवर अनुदान द्यावे. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी वेगळे अनुदान चालू करावे, अशी मागणी ग्रंथालय कर्मचार्‍यांनी केली आहे.

मराठी राजभाषा निर्धार समितीचे खरे कार्य चालू झाले ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

येथे झालेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात ‘मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत गप्प बसणार नाही’, असा निर्धार सर्वांनी केला आहे. यामुळे समितीच्या पुढील कृतीवर आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोमुनिदादसाठी पूर्णवेळ प्रशासक मिळणार आणि कर्मचार्‍यांचीही भरती होणार

कोमुनिदादचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी पूर्णवेळ प्रशासकासह अन्य कर्मचार्‍यांचीही लवकरच भरती होणार आहे, तसेच कोमुनिदादचे संगणकीकरण करण्याची प्रक्रियाही लवकरच चालू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोमांस विक्री करणार्‍यांना सावंतवाडीतून हद्दपार करा ! – सकल हिंदु समाजाची मागणी

शहरात मागील ३५ वर्षांपासून गोमांस विक्री करणार्‍या आरोपीला वाचवण्यासाठी हिंदू बांधवांना चुकीच्या पद्धतीने गोवले जात असल्याचा आरोप सकल हिंदु समाजाने केला आहे.