शेतमाल हमीभावाने खरेदी न झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी ! – भारतीय किसान संघ

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी सरकारला पाठिंबा दिला. निवडणुकीत कर्जमुक्ती, तसेच सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस यांची हमीभावाने खरेदी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. शेतीमाल हमीभावाने खरेदी न झाल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे, अशी खंत ‘भारतीय किसान संघा’ने व्यक्त केली आहे.