काबुल – अफगाणिस्तानात नुकतीच ४ जणांना ३ वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आली. ‘तालिबान सत्तेत आल्यानंतर एकाच दिवसात मोठ्या संख्येने फाशी दिल्याची ही पहिलीच घटना आहे’, असे तालिबान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जागतिक दबावाला न जुमानता तालिबानने ही कारवाई केली आहे.
अफगाणिस्तानच्या ३ प्रांतांमधील मैदानांमध्ये गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. यामुळे तालिबान सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी फाशी दिल्याची एकूण संख्या १० झाली आहे. तालिबानने या सार्वजनिक कार्यक्रमासाठी लोकांना औपचारिकपणे आमंत्रित केले होते. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या जागतिक मानवतावादी संघटनेने अशा घटना मानवतेच्या विरोधात आहेत, असे म्हटले आहे.