कुदळवाडी येथील कारवाईविषयी खासदार अमोल कोल्हे यांनी महापालिकेकडे अहवाल मागितला !

पिंपरी (जिल्हा पुणे) – चिखली आणि कुदळवाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी कारवाई केली. यावरून कारवाईची प्रक्रिया, करवसुली, तसेच कारवाईमुळे उद्ध्वस्त झालेल्या ५०० लघुउद्योगांचे पुढे काय केले ? असे प्रश्न उपस्थित करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितला आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सविस्तर अहवालाची मागणी केली आहे. माहिती देण्यास दुर्लक्ष केले जात असून पुन्हा दुर्लक्ष केल्यास संसदेत हे सूत्र मांडू, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

कुदळवाडी ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून प्रसिद्ध आहेच, तसेच बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या वस्त्यांमुळे कुप्रसिद्धही आहे ! असे असतांना अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले, तर या लोकप्रतिनिधींना खेद वाटण्याचे कारणच काय ? विशिष्ट समाजातील लोकांसाठी कळवळा आहे का ? असा प्रश्न सामान्यांना पडतो. हिंदूंवरील अत्याचार, गोरक्षकांवरील आक्रमण यासंदर्भात मात्र हे लोकप्रतिनिधी शांत बसतात, हे लक्षात घ्या !