Naxals killed In Encounter : नक्षलवादी आणि पोलीस यांच्यातील चकमकीत ३ नक्षलवादी ठार !

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील घटना !

मुंबई – छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती भागात माओवादी नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक उडाली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्या. या वेळी ३ माओवादी नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. चकमकीनंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात असलेला शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त केली आहेत.