आझमगड (उत्तरप्रदेश) – पोलिसांनी अरुशा गावात हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवणार्या टोळीच्या कारवाया उघड केल्या. ज्या घरात हिंदूंचे धर्मांतर केले जात होते, तेथे ३० हून अधिक पुरुष आणि महिला जमले होते. पोलिसांनी घरमालक गुलाबचंद आणि त्याची पत्नी बंदेयी यांना अटक केली आहे. (धर्मांतर केल्यावरही बाटगे त्यांचे हिंदु नाव पालटत नाहीत, हे लक्षात घ्या ! असे करून त्यांना हिंदु समाजामध्ये वावरण्यात आणि हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते ! – संपादक) या धर्मांतराच्या कामात काही बाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.
१. धर्मांतराच्या प्रकरणी हॅपी सिंह नावाच्या स्थानिक व्यक्तीने पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
२. तक्रार मिळताच पोलीस आरोपीच्या घरी पोचले आणि तिथून एक बायबल आणि काही पत्रके जप्त केली.
३. स्थानिक लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी पैसे आणि नोकर्यांचे आमीष दाखवले जात होते. यासमवेतच त्यांना ‘हिंदूंच्या देवतांनी पूजा करू नका’, असेही सांगितले जात होते.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशामध्ये धर्मांतरविरोधी कायदा असूनही ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करायला धजावतात. हे रोखण्यासाठी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक ! |