सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

गोवा – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मदिवस यांनिमित्त गोव्यात १७ ते १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या स्वागत समितीच्या वतीने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या महोत्सवाचे निमंत्रण सर्वाेच्च न्यायालयाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे दिले आणि त्याविषयी सविस्तर चर्चा केली.