(म्हणे) ‘मला भारतात पाठवू नका, तेथे माझा छळ होईल !’

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील आरोपी तहव्वुर राणा याची अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाला विनंती

आतंकवादी तहव्वूर राणा

वॉशिंग्टन (अमेरिका) – मुंबईवरील २००८ च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपी तहव्वुर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे भारतात प्रत्यार्पण करू नये, अशी विनंती केली आहे. ‘जर भारतात पाठवले, तर माझा छळ होऊ शकतो; कारण मी पाकिस्तानी वंशाचा मुसलमान आहे. त्यामुळे मला अधिक धोका आहे’, असा दावा राणा याने केला आहे. यासाठी त्याने ‘ह्युमन राईट्स वॉच’ वर्ष २०२३ च्या अहवालाचा हवाला देत, ‘भारत सरकार अल्पसंख्यांकांशी, विशेषतः मुसलमानांशी भेदभाव करते’, असे म्हटले आहे. त्याने त्याची प्रकृती वाईट आहे. त्याला पार्किसन्स (मेंदूशी संबंधित आजार), कर्करोग यांसारखे आजार आहेत. जर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची विनंती फेटाळली, तर त्याला भारतात पाठवले जाईल.

संपादकीय भूमिका

मुंबईवरील आक्रमणात १९६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण घायाळ झाले होते. त्याविषयी राणाला दुःख नाही; मात्र कथित छळाचे त्याला दुःख वाटते !