वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई-वडिलांबद्दल कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्‍चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.

काँग्रेसचे डोके आतातरी ठिकाणावर येईल का ?

सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे काँग्रेस पक्ष बुडाला. आम्ही सनातन धर्माला विरोध केल्यामुळे पराभूत झालो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांनी ३ राज्यांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून पक्षाला घरचा अहेर दिला. 

संस्कृत भाषेचे सौंदर्य !

ॐ कोन न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः।
मृदङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम्।।
अर्थ : या जगात (पैसे) खाऊ घातल्यावर कोण आपलेसे होत नाही ? मृदुंगसुद्धा कातडीच्या मध्यावर कणकेचा गोळा चिकटवल्यावर (आपल्याला हवा तसा) गोड गोड ध्वनी काढू लागतो.

रेल्वेतील असुविधा !

एकीकडे देशभरात आपण ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहोत. ‘मेक इन इंडिया’द्वारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून मेट्रो, मोनोरेल काढत आहोत; परंतु सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या रेल्वेतील मूलभूत सुविधांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे.

Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवरायांच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत ‘भारतीय नौदल दिन’ साजरा करूया !

आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.

राष्ट्रीय सुरक्षेतील भारतीय नौदलाचे महत्त्वपूर्ण योगदान !

‘वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार आक्रमण केले होते. त्यानिमित्त भारतीय नौदलाच्या वतीने प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ..

‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !

‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभल्याने आयुष्याचे सोने झाले’, असा भाव असलेल्या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांचा आज कार्तिक कृष्ण सप्तमी या दिवशी ८२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण त्यांचा साधनाप्रवास पाहूया.

पुणे येथील श्री. दादासाहेब वळकुंदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘मी अभियंता महाविद्यालयात (इंजिनीयरींग कॉलेजमध्ये) नोकरी करत होतो. तेव्हा माझ्या घरच्या भौगोलिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे देवाची भक्ती करण्यासाठी वातावरण पूरक नव्हते.