‘शहरी गरीब योजने’अंतर्गत बनावट प्रकरणे सादर करून महापालिकेची फसवणूक !

नाना पेठेतील (पुणे) आधुनिक वैद्याविरुद्ध गुन्‍हा नोंद !

पुणे – महापालिकेच्‍या ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत गरजू रुग्‍णांवरील उपचार, तसेच शस्‍त्रक्रियेसाठी आर्थिक साहाय्‍य देण्‍यात येते. नाना पेठेतील एका खासगी रुग्‍णालयाने या योजनेत उपचार घेण्‍यासाठी दिलेल्‍या १० हमीपत्रांपैकी ३ रुग्‍णांच्‍या नोंदी केल्‍याचे उघड झाले आहे. रुग्‍ण उपचार घेत असल्‍याचे भासवून हमीपत्र घेण्‍यात आल्‍याचे चौकशीत उघड झाले आहे. संबंधित रुग्‍णालयाने न केलेल्‍या शस्‍त्रक्रियेचे देयक महापालिकेला सादर करून, तसेच रुग्‍णांच्‍या नावे बनावट प्रकरणे सिद्ध करून महापालिकेची फसवणूक केल्‍याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शरद चव्‍हाण यांनी समर्थ पोलीस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीवरून नाना पेठेतील एका आधुनिक वैद्याविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. (या अगोदर महापालिकेच्‍या अंतर्गत अशी किती बनावट प्रकरणे झाली आणि त्‍यांचा लाभ कुणाकुणाला झाला, त्‍याचीपण पडताळणी होणे आवश्‍यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्‍हा एकदा उघड ! जसे वैद्यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद झाला, तसेच महापालिकेतील संबंधित अधिकार्‍यांनाही शोधणे आवश्‍यक आहे !