बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

कुडाळ येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून मागणी

कुडाळ – गेले काही महिने बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे, घरे, दुकाने नष्ट केली जात आहेत आणि हिंदूंच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात टाकण्यात येत आहे. एकीकडे बांगलादेशातील हिंदूंचा वंशविच्छेद चालू आहे आणि दुसरीकडे भारत बांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनला आहे. परिणामी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भारतात सर्वत्र संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावावे. घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, यांसह अन्य मागण्यांसाठी ५ जानेवारी २०२५
या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिजामाता चौक, कुडाळ येथे मूक निदर्शने करण्यात आली.

या वेळी धर्मप्रेमी सौ. प्रियांका शिरोडकर, श्री. अतुल सामंत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वासुदेव सडवेलकर, सदाशिव घाग, मयुर तवटे, गणेश धुरी यांच्यासह राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्र

धर्मप्रेमी सौ. मिताली सावंत यांनी आंदोलन चालू असतांना समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन समितीच्या कार्याविषयी जाणून घेतले. ‘पुन्हा अशी निदर्शने किंवा अन्य कार्यक्रम असल्यास संपर्क करा’, असे त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

वास्तविक हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये. सरकारने स्वतःहून बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !