भारतीय राखीव दलाच्या हवालदाराने पकडल्यानंतर पोलीस हवालदार सेवेतून निलंबित
पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थ आणि भ्रमणभाष संच यांची तस्करी करतांना पोलीस हवालदार नवदीप पावणी याला कारागृहात एका ठिकाणी पकडण्यात आले. कारागृहात सेवेत असलेल्या भारतीय राखीव दलाच्या (‘आय.आर्.बी.’च्या – ‘इंडियन रिझर्व बटालियन’च्या) एका सैनिकाने पोलीस हवालदार नवदीप पावणी याला पकडले. या घटनेनंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तो कारागृहाच्या आतील सुरक्षा घेरामध्ये समाविष्ट होता. नवदीप पावणी हा ६ मासांपूर्वी देहली येथे प्रशिक्षण घेऊन तेथील १ परीक्षा उत्तीर्ण झाला होता.
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील पोलीस हवालदार, सुरक्षारक्षक किंवा बंदीवान यांच्याकडे अमली पदार्थ किंवा भ्रमणभाष संच सापडण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि यामुळे हा कारागृह नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. गोवा पोलिसांची प्रतिमा मलीन करणार्या घटनाही यापूर्वी अनेक वेळा घडलेल्या आहेत.
संपादकीय भूमिकागुन्हेगारी वृत्तीचे पोलीस ! |