पौष्टिक अन्न ७४ टक्के भारतियांच्या अवाक्याबाहेर !

पौष्टिक अन्न प्रत्येकासाठी आवश्यक आहे; परंतु भारतातील तीन चतुर्थांश लोक याची व्यवस्था करण्यास असमर्थ आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

अटकेतील आरोपींना संसदेची गोळा केली होती माहिती !

संसदेत घुसखोरी करून धूर सोडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी संसदेची संपूर्ण माहिती गोळा केली होती. हे सर्व आरोपी दीड वर्षांपूर्वी कर्नाटकातील म्हैसुरू येथे भेटले होते. मनोरंजन गौडा हा म्हैसुरू येथे रहाणारा आहे.

मुसलमानांनी त्यांच्या नियंत्रणांतील हिंदूंची धार्मिकस्थळे स्वतःहून हिंदूंकडे सोपवली पाहिजे ! – इंद्रेश कुमार, रा.स्व.संघ

जर मुसलमानांनी असे केले नाही, तर हिंदूंनी एक समयमर्यादा निश्‍चित करून वैध मार्गाने लढून ती मिळवावीत, असेच हिंदूंना वाटते !

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचे होणार सर्वेक्षण ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. यासाठी ‘न्यायालय आयुक्तां’ची (कोर्ट कमिश्‍नरांची) नियुक्ती करण्यात येणार आहे. यावर १८ डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

‘महादेव ॲप’चे धागेदोरे दाऊदपर्यंत पोचल्याची गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती !

छत्तीसगड राज्यात ‘महादेव ॲप’द्वारे होणारी फसवणूक उघड झाली. त्यानंतर विविध राज्यांत या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.

हिंदु नेत्याच्या हत्येचा कट रचणे, हे आतंकवादी कृत्य नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

आसिफ मुस्तहिन नावाच्या आरोपीने हिंदु नेत्याची हत्या करण्याचा कट रचला होता; मात्र ते आतंकवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.एस्. सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपिठाने नमूद केले.

(म्हणे) ‘लडाख आमचा भाग असून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवणे चुकीचे !’ – चीन

अरुणाचल प्रदेशवर दावा करणार्‍या चीनने आता लडाखवर दावा करणे, हा चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारताकडून गेल्या ७५ वर्षांत ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले गेले नसल्याचाच परिणाम म्हणावा लागेल !

मध्यप्रदेशात भोंग्यांनंतर आता उघड्यावर विनाअनुमती मांस विक्रीवर बंदी !

आतापर्यंत असे का होत होते आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करत होते ? याची चौकशी झाली पाहिजे !

Indian Fishermen Detained: श्रीलंकेच्या नौदलाकडून ६ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

या वर्षात आतापर्यंत २२० मासेमार्‍यांना झाली आहे अटक !

नाशिक येथील स्वयंभू कपालेश्‍वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

वस्त्रसंहिता लागू करणार्‍या कपालेश्‍वर देवस्थानचे अभिनंदन. अन्यत्रच्या देवस्थान मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा !