मोरजी येथे हिमाचल प्रदेशाच्या रहिवाशाकडून साडेचार लाख रुपये किमतीचे चरस कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कुल्लू, हिमाचल प्रदेश येथील जवाहर सिंह जिबू याला मोरजी येथे कह्यात घेऊन त्याच्याकडून ४५० ग्रॅम चरस कह्यात घेतले आहे. या चरसाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ४ लाख ५० सहस्र रुपये आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांनी दिली आहे.

गुप्तचर विभागाला मोरजी येथे अमली पदार्थ आणले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मोरजी येथे एक तरुण मध्यरात्री घुटमळत असल्याचे पोलिसांना आढळले. त्याला कह्यात घेतले असता त्याच्या पिशवीत पोलिसांना अमली पदार्थ सापडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित जवाहर सिंह जिबू याने हिमाचल प्रदेशातील त्याच्या मूळ गावी चरसचे उत्पादन केल्याचे आणि ते विक्रीसाठी गोव्यात घेऊन आल्याचे समजले.