सदस्यांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे २० मिनिटे सभागृह स्थगित !

‘कळमनुरी येथील आदिवासींसाठी असलेल्या शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव’ या लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर मान्य नसल्याने विरोधकांनी सभागृहांमध्ये गोंधळ केला, तेव्हा ८ मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आले.

निवासी आणि अनिवासी सर्वच आश्रमशाळांना अनुदान देण्यात येईल ! – गुलाबराव पाटील, मंत्री

राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी आणि अनिवासी आश्रमशाळेतील शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचार्‍यांना केंद्रशासनाच्या धर्तीवर १०० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव वित्तखात्याकडे पाठवला आहे.

बेरोजगारी आणि पेपरफुटी यांवरून विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राज्य सरकारचा निषेध !

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी बेरोजगारी आणि पेपरफुटी प्रकरण यांसारख्या सूत्रांवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

आतंकवादविरोधी पथकाने पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल !  सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !

(म्हणे) ‘संसदेत घुसखोरी करणारे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात धार्मिक उन्माद माजवला असता !’- जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह

भाजपने कथित उन्माद माजवला असता, तर ललन सिंह यांच्यासह अन्य ढोंगी निधर्मीवादी पक्षांनी या मुसलमानांची बाजू घेत त्यांना निरपराध ठरवण्याचा प्रयत्न केला असता.

काँग्रेसच्या काळात निवडणूक घोषित होण्यापूर्वी मुंबईतील आरे वसाहतीमधील श्रीराम मंदिराजवळील भूखंड कब्रस्थानासाठी हस्तांतरित !

काँग्रेसचे सरकार असतांना आरे वसाहत युनिट २० येथील श्रीराम मंदिराच्या जवळील अडीच सहस्र मीटर भूमी एका खासगी संस्थेला कब्रस्थानासाठी देण्यात आली.

मालदीव भारतासमवेतचा ‘हायड्रोग्राफिक’ सर्व्हेक्षण करार संपवणार !

चीन समर्थक राष्ट्रपतींमुळे मालदीवकडून सातत्याने भारतविरोधी निर्णय घेतले जाणार, यात आश्‍चर्य नाही. अशा स्थितीत भारताने मालदीवचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला पाहिजे !

आतंकवादी पन्नू याच्या हत्येच्या कथित कटातील आरोपीची सर्वोच्च न्यायालयात याचिका !

अमेरिकेत स्थायिक झालेला खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येसाठी सरकारी अधिकार्‍यासमवेत कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ता यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

(म्हणे) ‘कलम ३७० विषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकीय !’ – अन्वर काकर, पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे !

मराठा आरक्षणावरून बीड येथे झालेल्या हिंसाचाराची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार !

या दुर्घटनेतील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे ? याचे अन्वेषण होत आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील असले, तरी आरोपींवर कारवाई केली जाईल – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस