‘हिंदू व्‍यवसाय बंधू’चे सांगलीत १० जानेवारीपासून भव्‍य प्रदर्शन !

मंत्री नितेश राणे

सांगली – हिंदूंनी हिंदूंना व्‍यवसाय द्यावा आणि सर्व हिंदूंनी आर्थिक उन्‍नती करावी, या उद्देशाने सांगलीत ‘हिंदू व्‍यवसाय बंधू’ हा अतिशय लोकप्रिय समूह सिद्ध झाला आहेे. या समूहाच्‍या पुढाकाराने १०, ११ आणि १२ जानेवारीला एक व्‍यवसाय प्रदर्शन शासकीय रुग्‍णालय मार्ग, ‘चेतना हॉल’ येथे आयोजित केले आहे. यात गृहोपयोगी वस्‍तू, कपडे, खेळणी, दागिने, सौंदर्य प्रसाधने इत्‍यादी वस्‍तूंचे प्रदर्शन कक्ष आहेत. याचे उद़्‍घाटन प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि मंत्री नितेश राणे यांच्‍या हस्‍ते १० जानेवारीला दुपारी २ वाजता होणार आहे. तरी या अभिनव उपक्रमामध्‍ये आपण सहभागी होऊन हिंदू व्‍यवसाय बंधूंना प्रोत्‍साहन द्यावे, असे आवाहन ‘हिंदू व्‍यवसाय बंधू’ गटाचे संस्‍थापक श्री. नंदकुमार बापट आणि श्री. श्रीरंग केळकर यांनी केले आहे.

या प्रदर्शनात येणार्‍या प्रेक्षकांसाठी प्रतिदिन ‘लकी ड्रॉ’वर गृहोपयोगी वस्‍तू म्‍हणून भेट मिळणार आहेत. या प्रदर्शनासाठी माधुरी दांडेकर, ऐश्‍वर्या केळकर, सुधीर कोळी, दिलीप देवधर, मिलिंद कदम, कलिका पटवर्धन यांचे साहाय्‍य लाभले आहे.