विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक अटकेत !
दादर – शारीरिक शिक्षणाचा वर्ग घेणार्या शिक्षकाने १२ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेत विनयभंग केला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी गौरव चौहान या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका : अशा वासनांध शिक्षकांना बडतर्फच करायला हवे !
१३ बांगलादेशी घुसखोर अटकेत !
मुंबई – घाटकोपर पोलिसांनी १३ बांगलादेशी घुसखोरांना नालासोपारा येथून अटक केली आहे. ते सर्वजण अनधिकृतरित्या येथे रहात असल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिका : घुसखोरांचे नंदनवन झालेला भारत !
नाशिकमध्ये गुंडांकडून सीसीटीव्हीची तोडफोड !
नाशिक – येथे ८ ते १० गुंडांनी सिडको परिसरातील महाकाली चौक उद्यानातील ‘जॉगिंग ट्रॅक’च्या (धावण्याच्या ठिकाणाच्या) सीसीटीव्ही कॅमेर्यांची तोडफोड केली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेला आहे.
संपादकीय भूमिका : अशा गुंडांवर नाशिक पोलीस काय कारवाई करणार ?