शहापूर (जिल्‍हा ठाणे) येथील लाचखोर ग्रामपंचायत अधिकारी कह्यात !

ठाणे – प्रलंबित कामासंदर्भात पत्र देण्‍यासाठी लाच घेणार्‍या शहापूर येथील वरस्‍कोळ ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गणेश राठोड यांनी तक्रारदाराकडून ५ सहस्र रुपयांच्‍या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेली ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना राठोड यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)