Koyna EarthQuake 2025 : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्‍य धक्‍का !

सातारा – कोयना धरण परिसरात ५ जानेवारी या दिवशी सकाळी ६.५६ वाजता भूकंपाचा सौम्‍य धक्‍का बसला. त्‍याची तीव्रता २.४ रिश्‍टर स्‍केल एवढी नोंदवली गेली आहे. वर्ष २०२५ च्‍या प्रारंभी राज्‍यात झालेला हा पहिलाच भूकंप आहे. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोचलेला नाही, असे धरण व्‍यवस्‍थापनाने म्‍हटले आहे.

भूकंपाचा परिणाम अभ्‍यास करण्‍यासाठी कोयना धरणावर विशिष्‍ट स्‍वरूपाची यंत्रणा कार्यान्‍वित करण्‍यात येणार आहे. या माध्‍यमातून धरणाची सुरक्षा अधिक बळकट होईल. धरणाच्‍या तळाशी, मध्‍यभागी आणि वरील भागात ही उपकरणे बसवण्‍यात येणार आहेत. त्‍यामुळे भूकंपाचा भूगर्भातील हालचालींवर होणार्‍या परिणामांचा अभ्‍यास करता येईल.