‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !
‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.