पुणे – दिवे घाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गांचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा. अल्प दराने निविदा भरून कामे मिळवतांना घेतलेल्या कामांचा दर्जा चांगला ठेवा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (‘एन्.एच्.ए.आय.’च्या) अधिकार्यांसह ठेकेदारांना दिल्या. ते ‘एन्.एच्.ए.आय.’च्या अधिकार्यांसमवेत पालखी महामार्गाच्या विविध टप्प्यांच्या कामांचा आढावा घेत होते तेंव्हा त्यांनी काही सूचनाही केल्या.
धर्मापुरी ते लोणंद या पालखी मार्गांवरील चौथ्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पाटस ते बारामती ते इंदापूर या दुसर्या टप्प्यांतील काम संथगतीने चालू आहे, अशी माहिती एन्.एच्.ए.आय.च्या अधिकार्यांनी या बैठकीमध्ये दिली.
हडपसर ते दिवे घाट या महामार्गाचे काम चालू केले आहे. ते होण्यासाठी २ वर्षे लागतील. हे काम करतांना नागरिकांना वाहतुकीच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) मेपर्यंत पूर्ण करा, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.