मुंबई – मुंबईत हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता पडताळण्यासाठी मुंबई महापालिकेकडे केवळ एकच वाहन आहे. ते वाहनही नादुरुस्त आहे. ५ जानेवारी या दिवशी मुंबई एक्यूआय (हवा गुणवत्ता निर्देशांक) १५ पर्यंत पोचला आहे. तो गंभीर श्रेणीतील गणला जातो. (केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक आकडेवारीनुसार, ० ते ५० या श्रेणीतील एक्यूआय चांगला, ५२ ते १०० हा समाधानकारक श्रेणीत गणला जातो, तर त्याहून अधिक गंभीर श्रेणीत मोजला जातो.)
पालिकेने नवीन ४ वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे; पण त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही.
संपादकीय भूमिकाजनतेच्या जिवाचा विचार करता आणि दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण पहाता महापालिकेने तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक ! |