पुणे येथे ज्‍येष्‍ठ नागरिकास बांधून चोरी करणार्‍या अल्‍पवयीन ‘केअर टेकर’ मुलास अटक !

१२ घंट्यांमध्‍ये पोलिसांनी अटक केली 

पुणे – कोरेगाव परिसरातील ‘अग्रसेन सोसायटी’मध्‍ये रहाणार्‍या जगदीश प्रसाद अग्रवाल (वय ८० वर्षे) आजोबांकडे ‘केअर टेकर’ (देखभाल करणारी व्‍यक्‍ती) म्‍हणून १५ वर्षीय मुलगा काम करत होता. (अल्‍पवयीन मुलांना कामावर ठेवण्‍यास कायदेशीर मनाई असतांना अशा मुलांना कामावर ठेवणे हा गुन्‍हा आहे, हे घरच्‍यांना कळू नये का ? – संपादक) त्‍याने आजोबांचे हात-पाय बांधून, चाकूचा धाक दाखवून ३२ सहस्र रुपये आणि २ भ्रमणभाष यांची चोरी केली. या अल्‍पवयीन मुलाला पोलिसांनी १२ घंट्यांमध्‍ये अटक केली आहे. भ्रमणभाषच्‍या तांत्रिक विश्‍लेषणाच्‍या साहाय्‍याने त्‍याला अटक केली. २० दिवसांपूर्वी कामावर आलेल्‍या या मुलाने आजोबांनी कुणी भेटायला येत नाही, याची संधी साधून १ जानेवारी या दिवशी आजोबांकडे चोरी केली.

संपादकीय भूमिका

कुणावर विश्‍वास ठेवण्‍याची सोयच राहिली नाही. मुलांना शाळांमधून धर्मशिक्षण दिल्‍यास मुले चोरी करण्‍याचा विचार करणार नाहीत !