भूमाफियांनी सरकारची भूमी लाटल्याचा प्रकार उघड, महसूल विभागाची पुनर्रचना करण्याची उपाययोजना !

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील म्हारळ येथील संरक्षण विभागासाठी सरकारने ७० हून अधिक शेतकर्‍यांकडून ८३ एकर भूमी घेतली. या भूमीवर प्रकल्प झाला नसल्याचे लक्षात आल्यावर या शेतकर्‍यांपैकी २१ जण आणि या भूमीशी संबंधित नसलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन सरकारकडून १ वर्षासाठी कसण्यासाठी घेतली.

उल्हासनगर येथे मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू

मद्य प्राशन करून गाडी चालवणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

पुणे येथे नदीपात्रात कचरा टाकल्याने फटाका स्टॉलधारकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई !

आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता ६ वर्षांपासून येरवडा कारागृहात असल्याची कारागृह प्रशासनाची माहिती !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात भरती करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या वेळी तो १० दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता.

अमरावती येथे कंत्राटदाराने गृहसंकुलाचा वीजप्रवाह बंद करून ‘डीपी’ला सील लावले !   

शहरातील योगीराजनगर तपोवन परिसर येथे मनपाद्वारे ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत बांधलेल्या गोदावरी हाऊसिंग सोसायटी या इमारतीला वीजपुरवठा करणार्‍या ‘डीपी’चा वीजपुरवठा बंद करून कंत्राटदाराने सील लावले.

आढे (जिल्हा पुणे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता सुतार पुरस्काराने सन्मानित !

मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता सुतार यांना ‘राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

आजपासून नगर शहरातील नाना महाराज मंदिरात २३१ वा अखंड हरिनाम सप्ताह

२७ डिसेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रमाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल. नगर शहर आणि उपनगरातील भाविकांनी या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस पाटील भरतीमध्ये आरक्षण लागू होण्याची शक्यता !

अन्य शासकीय पदांच्या भरतीमध्ये चक्रीपद्धतीने आरक्षण आहे. पोलीस पाटील भरती मात्र वांशिक पद्धतीने केली जात आहे. पोलीस पाटील असलेल्या व्यक्तीच्या पुढील पिढीतच या पदाची नियुक्ती होते.

हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणावी, तसेच अयोध्यानगरी मद्य-मांस मुक्त करावी !

आर्णी आणि कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण आम्ही देऊ,असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.