मुंबईत ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर १३ सहस्रांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त !

इंग्रजी नववर्ष साजरे करण्यासाठी येथील चौपाट्या, हॉटेल्स, बार, दुकाने, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी पहाटेपर्यंत गर्दी असते. घातपात, छेडछाड आदी गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री १३ सहस्रांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांची २९ डिसेंबरला ‘ऑल आऊट’ मोहीम झाली !

अशा कारवाया प्रतिदिन काही मास केल्या तर मुंबईत गुन्हेगारीच उरणार नाही ?

लक्षतीर्थ वसाहत (कोल्हापूर) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे पत्रे काढण्यात आले !

ठिकठिकाणी उभारण्यात येणारी अनधिकृत प्रार्थनास्थळे हटवण्यासाठी हिंदूंना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःचे कर्तव्य का पार पाडत नाही ?

पुणे महापालिकेने ११ इमारतींतील ५०० सदनिका पाडल्या !

अनधिकृत इमारती बांधल्या जाऊ नयेत, यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार ? विनाअनुमती बांधकाम करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वन विभागाकडून १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.

अहिल्यानगर येथे ‘टिपू सुलतान शरीरसौष्ठव स्पर्धे’चे आयोजन !

उत्कर्ष गीते म्हणाले की, भविष्यात औरंगजेब, अकबराच्या नावाने, महंमद गझनीच्या नावानेही अशा संस्था निघतील आणि या संस्था असेच उपक्रम राबवून मोगलांचे उदात्तीकरण करतील.

नवीन समवेत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनरुज्जीवित करावे ! – प्रशांत दामले, अभिनेते आणि नाटककार

राज्यात अनेक नाट्यगृहे उभारण्यात आली आहेत; मात्र या नाट्यगृहांची सध्या दुरवस्था झाली आहे. राज्यशासन आता कोट्यवधी रुपये व्यय करून ७० नवीन नाट्यगृहे उभारणार आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील ४३ पतसंस्था अवसायनात !

ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत, त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते.

रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडला

तालुका स्तरावर कृती आराखड्याविषयी दुर्लक्ष केले जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता कृती आराखडे वेळेत सादर न होणे, हे लज्जास्पद !  

देशाची ‘सेक्युलर’ शब्दामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे देशातील श्रद्धास्थाने, परंपरा यावर आघात केले गेले. ‘परकीय आहे ते चांगले आणि भारतीय म्हणजे टाकाऊ’ अशी भावना जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न झाला.