मुंबईत ५ कोटी ७७ लाख रुपयांची विदेशी सिगारेट हस्तगत !

येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून गुप्तचर विभागाच्या पथकाने ५ कोटी ७७ लाख रुपयांची सिगारेट हस्तगत केली. समुद्रमार्गे ही विदेशी सिगारेट भारतात आणण्यात आली होती. सिगारेटच्या खोक्यांवर चिंच झाकण्यात आली होती.

भिवंडी येथे ८०० किलो प्लास्टिक जप्त !

भिवंडी शहरात महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत ‘प्लास्टिकमुक्त भिवंडी’ करण्याचा संकल्प केला आहे.

‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध !

आवेदन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ जणांनी आवेदन मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक-व्यापारी यांची सर्वांत मोठी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी (कल्याण) कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ९ जानेवारी या कालावधीत श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणार्‍या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे.

२ ते ८ जानेवारी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन !

दमाणीनगर, ‘शुभम हॉल ग्राऊंड’ येथे प्रतिदिन दुपारी ३.३० ते रात्री ७.३० या वेळेत ही कथा होणार आहे, अशी माहिती श्री. मुकुंद भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमरावती येथे प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणारे २ तरुण अटकेत !; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी पसार !…

अल्पवयीन मुलाने अंगावर शिंकणार्‍या मुलाच्या तोंडावर सॅनिटायझर टाकले !

खडकवाडी (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे ख्रिस्ती धर्मांतर रोखण्यास यश !

या प्रार्थनेला ज्या महिला आल्या होत्या, त्यांना कपाळावरील टिकली किंवा कुंकू काढायला लावले होते. ही प्रार्थना घेण्यासाठी कोल्हापूर येथील मूळ रहिवासी जनार्दन गायकवाड हे पास्टर (पाद्री) आले होते.

१ जानेवारीपर्यंत अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्यास विश्व हिंदु परिषद कोल्हापूर महापालिकेला घेराव घालेल !

लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळांची बांधकामे अनधिकृत असतांना कारवाई करण्यात दिरंगाई केल्याविषयी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी,

महाराष्ट्र इसिसच्या आतंकवादी ‘मॉड्युल’ प्रकरणातील ६ मुख्य आरोपींविरोधात आरोपपत्र प्रविष्ट !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने महाराष्ट्र इसिसच्या आतंकवादी ‘मॉड्युल’ प्रकरणातील ६ मुख्य आरोपींविरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

आजपासून जालना-मुंबई ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस चालू होणार !

मुंबई ते जालना ‘वन्दे भारत’ रेल्वे धावणार आहे. या रेल्वेची चाचणी २८ डिसेंबर या दिवशी पार पडली. ही रेल्वे २८ डिसेंबरच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पोचली.