अतिरिक्त ‘प्रोटीन’ मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात, सावधान !
जे लोक व्यायाम अल्प करतात, खाल्लेले पचत नसल्याने अशक्त वाटल्याने ऊर्जा किंवा उत्साह मिळावा; म्हणून ‘प्रोटीन पावडर’ खातात आणि मग शनिवार-रविवार बाहेर ‘जंक फूड’ घेतात. यामध्ये प्रोटीन खाऊन ते अंगी लागणार नाही. त्याचे रूपांतर शेवटी चरबीमध्येच होणार हे नक्की.