सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ‘हरिनाम सत्संग सोहळ्या’च्या दिंडीचे स्वागत !

आश्रमवासियांनी दुतर्फा हात जोडून उभे राहून दिंडीचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, तर मुलींनी हातात भगवे झेंडे घेतले होते.

पुणे येथे सवाई गंधर्व महोत्सवात आग

कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस ‘फोटोगॅलरी’ असलेल्या ठिकाणी ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली आहे. कार्यक्रम चालू असतांना आग लागल्याने कार्यक्रमात प्रेक्षकांची तारांबळ उडाली होती.

अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात ९ जण ठार, ३ बचावले !

मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून वारसांना ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले आहे.

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये राज्यात पुणे चौथ्या स्थानी !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता न्यायालयात खटला जलद गतीने चालवण्यासह आरोपींना शिक्षा होण्यासाठीही तितक्याच तत्परतेने कारवाई होणे आवश्यक आहे.

रुग्णालयातील परिचारकांच्या संपामुळे ससूनमध्ये दिवसभरात केवळ आठच शस्त्रक्रिया !

या संपामुळे रुग्णांची झालेली हानी कोण आणि कशी भरून काढणार ?

पुणे येथे कपडे धुण्यासाठी घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर ३ वेळा अत्याचार !

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि कठोर उपाययोजना करावी ! तरच असे प्रकार थांबतील !

लोकमान्य टिळकांसारखे आदर्श राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात.

बिहारमध्ये तरुण पुजार्‍याची हत्या करून डोळे काढले !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदूंचे साधू-संत, पुजारी असुरक्षित असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

राज्यातील गड-दुर्गांचे मूळ स्वरूपात संवर्धन करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

गड-दुर्ग यांच्या संवर्धनाचे काम करतांना आधुनिक पद्धतीने न करता त्यांच्या मूळ रूपात त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.