सनातन धर्मावर टीका करणार्‍यांच्या विरोधात आम्हाला चीड केव्हा येणार ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आजपर्यंत पुरोगामी, देशद्रोही, नक्षलवादी यांनी या देशाविरुद्ध अनेक विरोधी विधाने केली आहेत. मग त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चे गुन्हे का नोंद झाले नाहीत ?

हजारीबाग (झारखंड) येथे मशिदीजवळ शौर्य जागरण यात्रेतून परतणार्‍या हिंदूंवर दगडफेक !

‘मशीद म्हणजे हिंदूंवर आक्रमण होण्याचे ठिकाण’, अशी आता नवीन व्याख्या करावी लागेल ! ‘इस्लाम म्हणजे शांती’ असे म्हटले जाते; मात्र त्यांच्या मशिदी मात्र अशांतता निर्माण करत आहेत !

 (म्हणे), ‘आम्ही सनातन वगैरे मानत नाही !’-जितेंद्र आव्हाड

सहस्रो वर्षांपासून पृथ्वीवर राज्य केलेल्या आणि आजही विदेशात मोठ्या प्रमाणात आचरण होत असलेल्या सनातन धर्माविषयीच्या आव्हाड यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांना विचारतो कोण ?

‘टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

आतापर्यंतच्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याच्या घोषणा वेळोवेळी दिल्या आहेत; मात्र अद्यापही राज्य टोलमुक्त झालेले नाही. टोल हे राजकारणातील अनेकांचे उदरनिवार्हाचे साधन झाले आहे.

खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात !

चीनच्या महिला पत्रकाराचा दावा !
भारत आणि पाश्‍चात्त्य देश यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच रचला कट !

पुस्तकातून विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न ! – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

पुस्तकाचे लेखक डॉ. थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते. असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ. पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे.

श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येते, तर पाकमधील सिंध का नाही ? – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देता येणार नाहीत ! – धर्मांध मुसलमानांची धमकी

कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !

राजस्थान सरकार मदरसा बोर्डातील ५ सहस्र ६६२ मुसलमान शिक्षकांना कायम करणार !

हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ? मुसलमानांची तळी उचलणार्‍या काँग्रेस सरकारला राजस्थानची जनता विसरणार नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !

लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका ! – गोवा खंडपिठ

राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत