|
न्यूयॉर्क (अमेरिका) – कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येमागे चीनचा हात आहे, असा दावा चीनच्या एका महिला पत्रकाराने केला. जेनिफर झेंग असे तिचे नाव असून सध्या ती अमेरिकेत रहात आहे. या हत्येमागे भारताच्या गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्रुडो यांनी यापूर्वी केल्याने दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने ट्रुडो यांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत.
Exclusive: Today, shocking revelations about the assassination of the #Sikh leader, #HardeepSinghNijjar in #Canada, have emerged from within the #CCP.
It is alleged that the assassination was carried out by CCP agents.
The purpose was to frame #India, creating discord between… pic.twitter.com/aweBigR1bf— Inconvenient Truths by Jennifer Zeng 曾錚真言 (@jenniferzeng97) October 8, 2023
जेनिफर यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे, ‘‘चीन कम्युनिस्ट पार्टी म्हणजे सीसीपीच्या हस्तकाचा निज्जरच्या हत्येत सहभाग आहे. भारत आणि पाश्चात्त्य देश यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच या हत्येचा कट रचला. यासाठी ‘सीसीपी मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’ने अमेरिकेतील सिएटल येथे एक अधिकारी पाठवला होता. येथे एक गुप्त बैठक झाली आणि त्यात निज्जरच्या हत्येचा कट रचण्यात आला. यासाठी सीसीपीच्या हस्तकाने भारतीय बोलतात, तशी इंग्रजी भाषाही शिकून घेतली. त्यानंतर १८ जूनला सीसीपीच्या हस्तकाने गोळ्या झाडून निज्जरची हत्या केली. त्यानंतर हत्येचे पुरावे नष्ट करून तो पसार झाला. त्याने स्वतःचे कपडे आणि हत्यारही जाळून नष्ट केले आणि दुसर्याच दिवशी कॅनडा सोडले.’’
संपादकीय भूमिकायावरून चीनचा तीव्र भारतद्वेष दिसून येतो ! जगासमोर चीनचे हे पितळ उघडे पाडून तो जगात एकटा पडेल, या दृष्टीने सरकारने ठोस प्रयत्न केले पाहिजे ! |