कु. वैष्‍णवी काळे हिचा शासकीय बुद्धीबळ स्‍पर्धेत तृतीय क्रमांक !

कु. वैष्‍णवी ही कोल्‍हापूर येथील स्‍थानिक वृत्तवाहिनी ‘एस्. न्‍यूज’चे कार्यकारी संपादक श्री. बाळासाहेब काळे यांची सुकन्‍या आहे.

सोलापूर शहरात नवीन रिक्‍शा थांब्‍यांची मागणी !

शहरातील महापालिकेची परिवहन व्‍यवस्‍था कोलमडलेली आहे. त्‍यामुळे शहरवासियांसमोर शहरांतर्गत प्रवास करण्‍यासाठी रिक्‍शाविना पर्याय नाही. शहरात सध्‍या १५ सहस्र रिक्‍शा धावत आहेत; पण शहरातील अधिकृत रिक्‍शा थांब्‍यांची संख्‍या केवळ २३९ इतकी आहे.

पुण्‍याच्‍या पालकमंत्रीपदी अजित पवार, तर कोल्‍हापूरच्‍या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ !

उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्‍हापूरचे पालकमंत्रीपद देण्‍यात आले आहे.

पाषाण (पुणे) येथे ७०० किलो भेसळयुक्‍त तुपासह एकास अटक !

अन्‍न पदार्थांमध्‍ये भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा परिणाम !

८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिर’ !

धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालय कोल्‍हापूर विभाग, कोल्‍हापूर ‘रिजन ट्रस्‍ट प्रॅक्‍टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्‍हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्‍णालये यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रविवार, ८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिरा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

वांगी (जिल्‍हा सांगली) येथील निकम कुटुंबियांना ११ ‘के.व्‍ही.’ विद्युत् वाहक तारेचा ‘शॉक’ देऊन ठार मारण्‍याचा प्रयत्न !

कडेगाव तालुक्‍यातील वांगी येथील अशोकराव शंकरराव निकम यांच्‍या घराच्‍या समोर आणि मागील द्वारास विद्युत् वाहक तारेचा उच्‍च दाबाचा ११ ‘के.व्‍ही.’चा ‘शॉक’ देऊन संपूर्ण कुटुंब संपवण्‍याचा प्रयत्न अज्ञातांनी केला.

महिला उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन !

ससून रुग्‍णालयाच्‍या परिसरात ‘मॅफेड्रीन’ अमली पदार्थ सापडला. त्‍यानंतर आरोपी ललित पाटील याने रुग्‍णालयातून पलायन केले. या दोन्‍ही प्रकरणांत कर्तव्‍यात हलगर्जीपणा केल्‍याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे.

वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्‍याच्‍या सामंजस्‍य करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’मध्‍ये स्‍वाक्षरी झाली.

दावोस दौर्‍याचा खर्च ३२ कोटी ! – उद्योगमंत्री उदय सामंत

दावोस दौर्‍यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्‍याचा आरोप खोटा असून या दौर्‍यात ३२ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या दौर्‍यामध्‍ये १ लाख ३७ सहस्र कोटींचे १९ सामंजस्‍य करार झाले असून त्‍यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

पुणे जिल्‍हा परिषदेने केलेल्‍या माध्‍यमिक शाळांच्‍या मूल्‍यांकनामध्‍ये ६१३ शाळा ‘नापास’ !

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यात शेकडो शाळा मूल्‍यांकनामध्‍ये अनुत्तीर्ण होणे, हे शिक्षण विभागाला लज्‍जास्‍पद !