‘हमास’चे संकेतस्‍थळ हॅक आणि सायबर यंत्रणा हॅकर्सकडून नष्‍ट !

हमासने इस्रायलवर आक्रमण केल्‍यानंतर तिचे संकेतस्‍थळ हॅक करण्‍यात आले आहे. हमासची संपूर्ण सायबर यंत्रणा यात नष्‍ट करण्‍यात आल्‍याचे म्‍हटले जात आहे. यामुळे हमासची मोठी हानी झाली आहे.

सातारा येथे जुगार अड्ड्यावर कारवाई !

सातारा बसस्‍थानकापासून जवळच असलेल्‍या राधिका रस्‍त्‍यावर जुगार चालू असल्‍याची माहिती मिळताच पोलीस जुगार अड्ड्यावर गेले.

शेतकरी दांपत्‍याची हत्‍या

माण तालुक्‍यातील आंधळी गावात संजय पवार आणि सौ. मनीषा संजय पवार या शेतकरी दांपत्‍याची अज्ञात आक्रमणकर्त्‍यांनी हत्‍या केली.

मराठी भाषेतील चित्रपटांना प्रतिसाद न दिल्‍यास मराठीची अवस्‍था बिकट होईल ! – अमेय खोपकर, मनसे

नुकताच प्रदर्शित झालेला ‘आत्‍मपॅम्‍फ्‍लेट’ हा मराठी चित्रपट पहाण्‍यासाठी चित्रपटगृहात केवळ ५ जणच होते. मराठीतले रसिक गेले कुठे ? एका उत्‍कृष्‍ट कलाकृतीला प्रेक्षक मिळत नसतील, तर कुठे चुकत आहे ?

सोलापूर येथे भूमी अभिलेख कार्यालयात ३६ पदे रिक्‍त !

भूमी अभिलेख कार्यालयात ३६ भूकरमापकांची पदे रिक्‍त आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येक प्रकाराच्‍या मोजणीला विलंब लागत आहे. मोजणी झाल्‍यानंतर त्‍या भूमीचा अहवाल सिद्ध करण्‍यासाठीही काही दिवस लागतात

मुंबईत ‘झोमॅटो’द्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांचा संप !

झोमॅटोद्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांनी त्‍यांच्‍या विविध मागण्‍यांसाठी ९ ऑक्‍टोबरपासून संप पुकारला आहे. ‘जोपर्यंत मागण्‍या मान्‍य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच राहील’,

(म्‍हणे) ‘मी प्रौढ चित्रपटच बनवणार !’’ : निर्मात्‍या एकता कपूर

चित्रपट निर्माती एकता कपूर यांना एका व्‍यक्‍तीने (नेटकर्‍याने) ‘अ‍ॅडल्‍ट (प्रौढ) चित्रपट बनवणे बंद कर’, असे सुचवले. यावर एकता यांनी म्‍हटले, ‘‘मी प्रौढ आहे. त्‍यामुळे मी तसेच चित्रपट बनवणार.’’

शिक्षक म्‍हणजे शैक्षणिक प्रगतीत मोठे योगदान देणारा घटक ! – शंभूराज देसाई

‘‘पूर्वी दळण-वळणाच्‍या सुविधा नसतांनाही शिक्षकांनी राज्‍याचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण, तेव्‍हाचे शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई असे विद्यार्थी घडवले.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ३ ते ४ बसगाड्या जळून खाक !

ताथवडे येथे जे.एस्.पी.एम्. महाविद्यालयाच्‍या परिसरात लावलेल्‍या शाळेच्‍या ३ ते ४ बसगाड्यांना रात्री ११.१५ वाजता अचानक आग लागली.

कोकण रेल्वेमार्गावर  १0 आणि १२ ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’

९ ऑक्टोबर या दिवशी प्रवास चालू होणारी १६३४६ ही मुंबईकडे जाणारी ‘नेत्रावती एक्सप्रेस’ ठोकर ते रत्नागिरी दरम्यान १ घंटा ३० मिनिटे थांबवून ठेवली जाईल.