कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !
कर्णावती (गुजरात) – येथील मुसलमानबहुल चंदोला भागातून जाणारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांध मुसलमानांनी अडवली. हे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात असल्याने धर्मांधांनी बस अडवून घोषणा बंद करण्याची धमकी दिली. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीही तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही.
शौर्य जागरण यात्रेनिमित्त हे कार्यकर्ते रिव्हर फ्रंट भागात गेले होते. तेथून ते परतत असतांना ही घटना घडली. धर्मांध मुसलमान बस थांबवून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना म्हणालेे, ‘‘तुम्ही आमच्या भागातून जातांना घोषणा का देत आहात? जर तुम्हाला घोषणा द्यायच्या असतील, तर तुमच्या भागात जाऊन द्या. जर आम्ही तुमच्या भागात येऊन ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या, तर काय होईल ?’’ (‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणारे या घटनेच्या वेळी कोण असुरक्षित आहेत, हे सांगतील का ? – संपादक) या वेळी येथे पोलीसही पोचले होते; मात्र ते हतबल दिसत होते. (धर्मांध मुसलमानासमोर हतबल होणारे भाजपच्या राज्यातील पोलीस हिंदूंना अपेक्षित नाहीत ! असे पोलीस दंगलींच्या वेळी हिंदूंचे काय रक्षण करणार ? – संपादक)
श्रीराम के नाम पर सत्ता में बैठे लोगों को आज स्पष्ट करना होगा कि क्या गुजरात मे जय श्रीराम कहने पर प्रतिबंध है..?आज कर्णावती-रिवरफ्रंट से #बजरंग_दल की शौर्य यात्रा का समापन करके अपने घर लौट रहे कार्यकरों की बस को मुस्लिम बहुल जमालपुर में कट्टरपंथियों ने रोक लिया। क्यों रोका..… pic.twitter.com/PlK5tXCGyr
— Hitendrasinh Rajput (@TheHitendrasinh) October 8, 2023
गोध्रा प्रमाणे कृत्य करण्याचे षड्यंत्र होते का ? – विहिंप
या घटनेविषयी विश्व हिंदु परिषदेचे गुजरातचे प्रवक्ते हितेंद्र सिंह राजपूत यांनी सांगितले की, ही दुर्दैवी घटना आहे. आता गुजरातमध्ये हिंदूंना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यावर बंदी असणार आहे ? मुसलमानांचा हिंदु तीर्थयात्रेकरूंची बस थांबवण्यामागे काय उद्देश होता ? यामागे कोणते षड्यंत्र होते का ? मुसलमान गोध्राप्रमाणे (वर्ष २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकावर मुसलमानांनी कारसेवक असणार्या साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लावली होती. यात ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता.) कृत्य करू इच्छित होते का ? या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री हर्ष संघवी आणि पोलीस महासंचालक यांना करत आहे. व्हिडिओच्या आधारे मुसलमानांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल भागात हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास विरोध करणार्यांकडून हिंदूबहुल भागात प्रतिदिन आणि वर्षाचे ३६५ दिवस मशिदींवरून ५ वेळा ‘या जगात अल्लाखेरीज कुणीच महान नाही’ अशा प्रकारची बांग देतात. त्यावर ते का बोलत नाहीत ? |